नरेंद्र मोदींना अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं निमंत्रण, सचिन तेंडुलकरने सह कुटुंब घेतली पंतप्रधानांची भेट

Arjun Tendulkar News

नरेंद्र मोदींना अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं निमंत्रण, सचिन तेंडुलकरने सह कुटुंब घेतली पंतप्रधानांची भेट
Sachin TendulkarMarathi NewsPM Narendra Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 103 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सह कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्याने पंतप्रधान मोदींना आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची पत्रिका दिली आणि त्यांना आमंत्रित केलं.

Arjun Tendulkar Wedding : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सह कुटुंब मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट यामुळे विशेष होती कारण यावेळी सचिनने त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधानांना दिली आणि त्यांना या लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं.

अर्जुन तेंडुलकर आणि त्याची बालमैत्रीण सानिया चंडोक या दोघांचा साखरपुडा 13 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. मात्र दोघांच्या नात्याबाबत अधिकृतपणे तेंडुलकर किंवा चंडोक कुटुंबाकडून सांगण्यात आले नव्हते. मात्र पहिल्यांदाच सचिन तेंडुलकरने अर्जुन आणि सानियाच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. We were honoured to invite Hon’ble Prime Minister Shri narendramodi ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you, Modi ji, for your blessings and thoughtful advice for the young couple. pic.twitter.com/7oxOZm3i5X Sachin Tendulkar February 10, 2026 सचिन तेंडुलकरने केली पोस्ट : सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलं की, आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. धन्यवाद मोदी जी तुम्ही तरुण जोडप्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि विचारशील सल्ला दिल्याबद्दल. गेल्यावर्षी झाला साखरपुडा : अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक हे दोघे लहानपणीपासूनचे मित्र होते. दोघांचं कुटुंब सुद्धा एकमेकांना खूप चांगले ओळखतात. दोघांचा साखरपुडा १३ ऑगस्ट 2025 मध्ये एका खाजगी कार्यक्रमात झाला होता. मात्र याबाबत तेंडुलकर कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र पहिल्यांदाच सचिन तेंडुलकरने अधिकृतपणे अर्जुनच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 5 मार्च 2026 रोजी मुंबईत या दोघांचा विवाह सोहळा पार पडेल. तर याच्याशी संबंधित कार्यक्रम हे 3 मार्च रोजी सुरु होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांना अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचं आमंत्रण गेलं आहे. हेही वाचा : BCCI ने बहिष्काराच्या वादावर मौन सोडलं, म्हणाले बरं झालं पाकिस्तान सामना खेळायला तयार झालं नाहीतर.... कोण आहे सानिया चंडोक? सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चंडोक ही मुंबईतील नामांकित उद्योगपती आणि Graviss Group चे चेअरमन रवि घई यांची नात आहेत. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स आणि ब्रूकलिन क्रीमरी आईस्क्रीम ब्रँड ही सानिया चंडोक हिच्या कुटुंबाच्याच मालकीचे आहेत. सानिया ही Mr. Paws Pet Spa Store LLP या कंपनीची फाउंडर असून ती यात पार्टनर आणि डायरेक्टर म्हणून काम पाहते. प्राण्याप्रती असलेल्या प्रेमामुळे सानियाने पाळीव प्राण्यांच्या देखभालसाठी उपक्रम हाती घेतलाय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sachin Tendulkar Marathi News PM Narendra Modi

 

United States Latest News, United States Headlines



Render Time: 2026-04-02 12:29:48