तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल

Mumbai-Goa Highway News

तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल
KokanGaneshotsavKokan Railway
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 113 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.

Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.

Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे यंदाही हालच झाले. चिखल आणि खड्ड्यांच्या मुंबई गोवा हायवेवरुन प्रवास करण्याची वेळ पुन्हा एकदा चाकरमान्यांवर ओढवली. तासनतास चाकरमानी मुंबई-गोवा हायवेवर अडकून पडले होते. मुंबई माणगाव हे तीन तांसाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 12 तास लागतायत. अरुंद रस्त्यांमुळे लोणेरे, तळेगाव, माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होती. मुंबईहून गणपतीसाठी गावाला निघालेल्या चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला आला. खाण्या पिण्याचे प्रचंड हाल झाले. जे हाल मुंबई गोवा हायवेवर. तेच हाल कोकण रेल्वेतही झाले. गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं.. आणि त्याचा त्रास चाकरमान्यांनाच भोगावा लागला. कोकण रेल्वे असू दे किंवा मग मुंबई गोवा हायवे.. चाकरमान्यांचा दरवर्षीचा मनस्ताप ठरलेलाच आहे...मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाचं आणि विस्ताराचं काम 2010च्या अखेरीस सुरू करण्यात आलं. 2016ला काम पूर्ण होण्यासाठी डेडलाईन देण्यात आली. पण NGTची मान्यता, भूसंपादन आणि कंत्राटदारांच्या अडचणींमुळे काम रखडलं . 2022मध्ये दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. या अडथळ्यांमुळे महामार्ग 13 ते 14 वर्ष रखडला. 2016 च्या पहिली डेडलाईननंतर परत 2024ची डेडलाईन देण्यात आली. आता मुंबई गोवा हायवे पूर्ण व्हायला आता 2024 नाही तर 2026 उजाडणार अशी कबुली खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच दिलीय. याच रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी मुंबई-गोवा हायवे पूर्ण क्षमतेनं सुरु करु असं आश्वासन दिलं होतं... मात्र त्यांचं आश्वासन हे अळवावरचं पाणीच ठरलं..कासू ते नागोठणे, वाकण ते कोलाड, इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे महामार्गाची कामे अर्धवटकंत्राटदार काम सोडून निघून गेल्याने बाह्यवळण रस्त्याची कामं अर्धवट अवस्थेतयाच पट्ट्यात सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून अवजड वाहतुकीला मुंबई-गोवा हायवेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र हे बंदी आदेश झुगारून अवजड वाहनं रस्त्यावर आली. आणि त्याचाही फटका प्रवाशांना बसला. यंदाही मुंबई-गोवा हायवेवर खड्ड्यांची तीच समस्या कायम राहिली. चिखलाने भरलेल्या आणि खड्ड्यांनी चाळण झालेल्या मुंबई-गोवा हायवेवरुन चाकरमान्यांना गावची वाट धरायला लागली. आता मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यामागचं विघ्न कधी दूर होणार हे बाप्पालाच ठावूक.मुंबई

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kokan Ganeshotsav Kokan Railway Bad Condition Of Mumbai-Goa Highway गणेशोत्सव मुंबई-गोवा महामार्ग चाकरमणी

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good Newsकन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good NewsGanpati Special Trains: बाप्पाचे आगमन होताच चाकरमान्यांना वेध लागतात ते गावचे. यंदा कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
Read more »

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचामुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचागणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
Read more »

Flight to Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!Flight to Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!Flight to Kokan:एसटीचा खोळंबा झाल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेयत. अनेक चाकरमान्यांनी एसटीची बुकींग करुन ठेवलीय. पण एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिल्याने कोकणात जायचं कसं हा प्रश्न पडलाय. त्यात प्रत्येक सिझनप्रमाणे खासगी गाड्यांनी आपले दर दुपट्ट केल्यायत.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Read more »

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोनमनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोनMaharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली.
Read more »

Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी पोलिसांची तीन तास चौकशीMaharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी पोलिसांची तीन तास चौकशीMaharashtra Breaking News LIVE : देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Read more »



Render Time: 2026-04-02 06:10:03