IND VS SA : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं आणि त्यामुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला, परिणामी टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
IND VS SA : रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी भारतीय संघाने 350 धावांचं आव्हान दिलं होतं.
हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात आली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं आणि त्यामुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला, परिणामी टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने या सामन्यात 135 धावांची कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठोकलं. त्यामुळे विराट कोहली सध्या चर्चेत आहे. विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात तो युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची मजा घेताना दिसतोय. रांची स्टेडीयमच्या मैदानावर सामना सुरु होण्याच्या ठीक आधी मैदानावर एक किस्सा घडला. दोन्ही संघ राष्ट्रीय गीतासाठी मैदानात येणार होते. तेव्हा बाउंड्री लाईनवर विराट कोहली यशस्वी जयस्वालला पाहून तेरे नाम चित्रपटातील गाण्यावर फॅन्स करताना दिसले. नेमकं काय घडलं?यशस्वी जयस्वाल सध्या त्याचे केस वाढवत आहे. तेव्हा यशस्वीची हेअरस्टाईल बघून विराट कोहली त्याची मजा घेऊ लागला. विराटला यशस्वीला पाहून तेरे नाम मधील सलमान खानचं प्रसिद्ध गाणं तुझसे मेरी लगन लगी ची आठवण झाली आणि तो यशस्वी समोर या गाण्यावर डान्स स्टेप्स करून विराट त्याला चिडवताना दिसला. कोहलीचा हावभाव पाहून तिथे उभे असलेले इतर खेळाडू हसायला लागले आणि त्यांनी यशस्वी जयस्वालची खिल्ली उडवली. सामन्यापूर्वीच्या या विनोदी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.पाहा व्हिडीओ : Kohli trolling Jaiswals hairstyle with Salmans dance in Tere naam pic.twitter.com/V9jF1PccKK Gangadhar November 30, 2025FAQ : विराट कोहलीने कोणत्या सामन्यात शतक ठोकले?विराट कोहलीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात शतक ठोकले.विराट कोहलीचे शतक कितवे होते?विराट कोहलीचे शतक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83वे आणि वनडे कारकिर्दीतील 52वे शतक होते.विराट कोहलीने यशस्वी जयस्वालची मजा का घेतली?विराट कोहलीने यशस्वी जयस्वालची मजा त्याच्या हेअरस्टाईलमुळे घेतली.
Virat Kohli Yashavi Jaiswal Salman Khan Cricket News Marathi News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
तेरी नचाई नाचू हरियाणवी गाने पर Sapna Choudhary ने स्टेज पर मचाया गदर, अदाएं देख छूटे जनता के पसीनेSapna Choudhary Dance Video: देसी क्वीन सपना चौधरी के डांस के लाखों लोग दीवाने हैं. उनके हरियाणवी Watch video on ZeeNews Hindi
Read more »
ये क्या कह गईं...Smriti और Palash की शादी पोस्टपोन होने पर RJ Mahavash ने कहीं कुछ बातें, तेजी से वायरल हुआ वीडियोRJ Mahavash Video On Palash And Smriti Marriage: इंडियन क्रिकेटर स्मृति मंधाना और सिंगर पलाश मुच्छल Watch video on ZeeNews Hindi
Read more »
थोड़ा गलती हो गई, हाईवे पर ट्रक पलटने पर ड्राइवर ने मालिक को किया फोन, दिया ऐसा जवाब हंसते-हंसते हुआ पेट में दर्दTruck Driver Funny Video: सोशल मीडिया पर वायरल हुआ ऐसा फनी वीडियो, जिसको देखकर जनता का हंसना ही बंद Watch video on ZeeNews Hindi
Read more »
कॉलेज में ऊई अम्मा गाने पर लड़की ने पब्लिक के सामने किया जबरदस्त डांस, एक-एक स्टेप ने इंटरनेट पर मचाया धमाल!Girl Dance Video In College: सोशल मीडिया पर वायरल हुआ लड़की के डांस का शानदार वीडियो. जिसमें लड़की Watch video on ZeeNews Hindi
Read more »
नाव पर चढ़कर लड़के ने पेश की इंसानियत की मिसाल, शख्स की जान बचाने के लिए तालाब में कूदा, वीडियो वायरलViral Video: सोशल मीडिया पर बहुत तेजी से वीडियो वायरल हो रहा है, जिसमें शुभम नाम के लड़के ने रोड पर Watch video on ZeeNews Hindi
Read more »
अरे भाई पोपट हो गया, दुकान में सामान ले रहे शख्स के साथ कुछ ऐसा हुआ, देख जनता नहीं कंट्रोल कर पाई हंसीViral Funny Video: इंटरनेट पर वायरल हुई फनी वीडियो, जिसे देखकर जनता ता हंसना ही बंद नहीं हुआ. Watch video on ZeeNews Hindi
Read more »
