BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. आयीसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. आयीसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट आहे. त्याआधी जय शहा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली तर त्याचा प्रभाव बीसीसीआयवर पडणार आहे. बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शहा यांचा एक वर्षाचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. आयसीसी अध्यक्ष बनल्यानंतर बीसीसीआयमध्ये चार वर्ष ते कोणतंही पद भूषवू शकत नाहीत. 35 व्या वर्षीचे जय शाह आयसीसीच्या इतिहासातील सर्वात कमी वय असणारे अध्यक्ष बनू शकतात. आता प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले तर बीसीसीआयमध्ये त्यांच्या जागी सचिव म्हणून कोण जबाबदारी सांभाळणार? दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचे पूत्र रोहण जेटली यांचं नाव सचिव पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. रोहण जेटली हे बीसीसीआयचे पुढचे सचवि बनणार अशी जोरदार चर्चा आहे. रोहण जेटली हे सध्या दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत. जय शाह यांची आयसीसीमध्ये वर्णी लागली तरी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉयर बिन्नी आणि इतर अधिकारी मात्र आपापल्या पदावर कायम असतील. त्यांचा कार्यकाळ संपायला अद्याप एक वर्ष बाकी आहे.आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जय शाह यांनी अर्ज केल्यास त्यांच्याकडे 16 पैकी 15 आयसीसी बोर्ड मेंबर्सची मत आहेत. अध्यक्ष बनण्यासाठी केवळ 9 मतांची गरज असते. त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारीक बाब असेल. पण जय शाह हे आयसीसी अध्यक्ष बनण्यासाठी तयार आहेत का याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स आहे.रोहण जेटली हे भाजपचे माजी नेते अरुण जेटी यांचे पूत्र आहेत. अरुण जेटली यांचा बीसीसीआयमध्ये चांगला प्रभाव होता. त्यामुळे रोहण जेटली यांचीही बीसीसीआयवर मजबूत पकड आहे. क्रीडा प्रशासक म्हणून त्यांना बराच अनुभव आहे. दिल्ली प्रीमिअर लीगच्या आयोजनासाठीही रोहण जेटली यांनी दावा सांगितला आहे.आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा आतापर्यंत चार भारतीयांनी सांभाळली आहे. जगमोहन दालिया , शरद पवार , एन श्रीनिवासन , आणि शशांक मनोहर .T20 World Cup 2024: टी20 महिला वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा, सातव्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज
Bcci Jay Shah ICC Secretary Arun Jaitley Rohan Jaitley BCCI Secretary Indian National Cricket Team Indian Cricket Team बीसीसीआई जय शाह अरुण जेटली रोहन जेटली भारतीय क्रिकेट टीम बीसीसीआय सचिव
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Anshuman Gaekwad: पूर्व क्रिकेटर अंशुमान गायकवाड़ के निधन पर पीएम ने जताया दुख, जय शाह ने भी दी प्रतिक्रियापूर्व भारतीय दिग्गज क्रिकेटर अंशुमान गायकवाड़ के निधन पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दुख जताया। वहीं, बीसीसीआई सचिव जय शाह ने भी शोक व्यक्त किया।
Read more »
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
Read more »
MHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशीलMHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
Read more »
Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'Sexual Abuse: महाराष्ट्रातील बदलापूर, कळवा येथे लैंगिक शोषणाच्या घटना समोर आला. यानंतर आता तामिळनाडूमधूनदेखील एक प्रकार समोर आलाय.
Read more »
जय शाह आईसीसी अध्यक्ष बने तो कौन होगा बीसीसीआई का सचिव? इन 4 की दावेदारी सबसे मजबूतबीसीसीआई के सचिव जय शाह आईसीसी के अगले अध्यक्ष बन सकते हैं। इस बीच सबसे बड़ा सवाल है कि जय शाह के बाद बीसीसीआई सचिव पद की जिम्मेदारी कौन संभालेगा।
Read more »
जय शाह ICC अध्यक्ष बने तो BCCI सचिव बनेगा पूर्व केंद्रीय मंत्री का ये वकील बेटाJay Shah: अगर बीसीसीआई के मौजूदा सचिव जय शाह आईसीसी के अगले अध्यक्ष बनते हैं तो फिर उनकी जगह लेने की रेस में पूर्व केंद्रीय मंत्री के बेटे का नाम आगे चल रहा है.
Read more »
