SHOCKING CRIME NEWS: हॉटेलमध्ये चुकून दुसऱ्या रुमचा दरवाजा ठोठावल्यानंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते फारच भयानक होतं. तिने पहाटेच्या सुमारास स्वत:ची सुटका करुन घेतल्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यावेळेस तिने पोलिसांना सविस्तर घटनाक्रम सांगितला.
SHOCKING CRIME NEWS: छत्रपती संभाजी नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 32 वर्षीय विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एका हॉटेलमधील चुकीच्या रुमचा दरवाजा या महिलेने ठोठावला.
त्यानंतर आरोपींनी या महिलेला रुममध्ये खेचले. जबरदस्तीने पीडितेला बिअर पाजली आणि रात्रभर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नेमकी कुठे आणि कधी घडली ही घटना?मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर येथे एका विवाहित महिलेने चुकून हॉटेलच्या चुकीच्या खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर तीन पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी, 17 डिसेंबर रोजी रात्री 11 ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसराजवळ घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित महिला एका मित्राकडून पैसे घेण्यासाठीच हॉटेलमध्ये गेली होती. मात्र, एका छोट्या चुकीमुळे तिच्यावर हा प्रसंग ओढावला. आर्थिक मदत मागण्यासाठी गेलेलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिले एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. पीडिता एका लहान मुलाची आई आहे. पीडिता कुटुंबातील मुख्य कमावती व्यक्ती आहे. या महिलेचा पती पूर्वी बेरोजगार होता आणि त्याने नुकतेच काम सुरू केले आहे. आर्थिक विवंचनेमुळे या महिलेने भोकरदन येथील एका मित्राकडे मदत मागितली होती. त्याने तिला रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले आणि 105 क्रमांकाची खोली आरक्षित केली होती.105 ऐवजी 205 क्रमांकाच्या खोलीचा दरवाजा वाजवला अन्...बुधवारी संध्याकाळी पीडित महिला हॉटेलमध्ये तिच्या मित्राला भेटली. त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि नंतर रात्रीचे जेवण केले. स्थानिक मराठी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री 11 च्या सुमारास ती महिला फोनवर बोलत असताना बाहेर पडली. परत आल्यावर, ती पहिल्या मजल्याऐवजी चुकून दुसऱ्या मजल्यावर गेली. आपण पुन्हा मित्राच्या खोलीत पोहोचलो आहोत असे समजून, तिने 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. 205 क्रमांकाच्या खोलीत तीन पुरुष बिअर पीत होते. जेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा महिलेने तिच्या मित्राचे नाव घेऊन विचारणा केली. त्या पुरुषांनी तो तिथे नसल्याचे सांगितले. ती निघून जात असताना, त्यापैकी एकाने तिचा मित्र आत असल्याचे खोटे सांगून तिला खोलीत ओढल्याचं पोलिसांनी घटनाक्रमाबद्दल माहिती देताना सांगितलं.दार आतून बंद केलं अन्...पोलिसांनी सांगितले की, दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. आरोपींनी तिला जबरदस्तीने बिअर पाजली आणि त्यानंतर रात्रभर एकएकाने तिच्यावर बलात्कार केला. त्या महिलेला अनेक तास खोलीत डांबून ठेवण्यात आले. पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास, तिने स्वतःची सुटका करून घेतली, दरवाजा उघडला आणि मदतीसाठी ओरडत बाहेर पळाली. पीडित महिला आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर वेदांत नगर पोलीस ठाण्यात गेली, जिथे तिने घडलेला प्रकार सांगत तक्रार नोंदवली. तोपर्यंत आरोपी हॉटेलमधून पळून गेले होते आणि त्यांनी त्यांचे मोबाईल फोन बंद केले होते.आरोपी पळून गेले पण तीन तासात अटकसहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस निरीक्षक प्रविणा यादव आणि उपनिरीक्षक संगीता गिरी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलचे रेकॉर्ड आणि रूम बुकिंगचे तपशील तपासले. या पुराव्यांच्या आधारे, आरोपींची ओळख पटवून त्यांना जिन्सी, मोंढा आणि भानुदास नगरसह विविध भागांतून तीन तासांच्या आत अटक करण्यात आली.आरोपींची नावं काय?अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे:घनश्याम भालूलाल राठोड ऋषिकेश तुळशीराम चव्हाण किरण लक्ष्मण राठोड आरोपी काय करतात?हे तिघेही अविवाहित असून जवाहर कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. त्यापैकी दोघे कर्ज वसुली करणाऱ्या एका फायनान्स कंपनीत काम करतात, तर एक जण खाजगी काम करत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी सांगितले की, हे तिन्ही आरोपी मित्र आहेत. पोलिसांनी महिलेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत.
Crime News Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
टैक्सी चालक ने पत्नी को ईंट से कूचकर मार डाला: शराब पीने को लेकर रहता था पति-पत्नी में विवाद, आरोपी की तलाश...meerut news meerut crime meerut crime news meerut police meerut ssp ssp meerut
Read more »
Wife Kills Husband: কাটোয়ায় কেলেঙ্কারি! পরপুরুষের টান অমোঘ, পথের কাঁটা স্বামীকে নৃশংস খুন স্ত্রীর...Husband Brutally Murdered Over Alleged Affair Wife Accused in Shocking Crime
Read more »
IIM JOKA Incident: পুলিস জোর করছে ধ*র্ষ*ণের অভিযোগ করতে! গোটা ঘটনা সাজানো... ভয়ংকর অভিযোগ IIM কাণ্ডে নির্যাতিতার বাবার...IIM calcutta incident student accused for physical harassment now victim fathers shocking claim no crime happened
Read more »
मुंबईत मोठ्या Atomic घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले BARC चे 14 नकाशे; 'ती' व्यक्ती कोण?Shocking Mumbai Crime News: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेबरोबरच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणेनं एकत्रितपणे केलेल्या कारवाईत या व्यक्तीला घेण्यात आलं ताब्यात
Read more »
दून एक्सप्रेस के S-3 कोच में चल रहा था 'सीक्रेट गेम'! 5 बैग खुलते ही RPF भी रह गई दंग, देखें VIDEOगया. गया जंक्शन पर वन्यजीव तस्करी का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है. ट्रेन से 105 कछुओं की बरामदगी की गई है, जिन्हें अवैध रूप से तस्करी के जरिए ले जाया जा रहा था. यह कार्रवाई दून एक्सप्रेस के एस-3 कोच में की गई, जहां जांच के दौरान पांच बैग और एक झोले में बंद कछुए मिले.
Read more »
पुतिन पर दबाव बढ़ाने की तैयारी, यूक्रेन को बिना ब्याज वाला 105 अरब डॉलर कर्ज देगा यूरोपीय संघ, रूस बोलाEU on Russia Ukraine War: अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप भले ही रूस के प्रति नजदीकी दिखा रहे हों लेकिन यूरोपीय संघ अब भी पुतिन को बख्शने के मूड में नहीं दिख रहे हैं. यूक्रेन की फायर पावर मजबूत करने के लिए ईयू ने उसे 105 डॉलर का भारी भरकम लोन देने का फैसला किया है.
Read more »
