TV Actor Veer Sharma: वीर हनुमान या टीव्ही शोमध्ये तरुण लक्ष्मणच्या भूमिकेसाठी वीर शर्माला ओळख मिळाली होती.
TV Actor Veer Sharma : टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. राजस्थानच्या कोटा येथे लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यातील एक बालकलाकार म्हणून छोट्या पडद्यावर काम केले आहे.
वयाच्या 10 व्या वर्षीच छोट्या पडद्यावर ओळख मिळवणाऱ्या वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळं श्वास गुदमरुन दोन्ही चिमुरड्यांना प्राण गमवावा लागला आहे. या चिमुकल्यांची आईदेखील अभिनेत्री आहे. वीर शर्माला सर्वाधिक ओळख टीव्ही शो वीर हनुमानमुळं मिळाली होती. या मालिकेत त्याने बाल लक्ष्मणची भूमिका साकारली होती. त्यांचे बोलके डोळे आणि उत्कृष्ट संवाद फेकण्याची कला यामुळं प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत बनला होता. इतकंच नव्हे तर येत्या काळात सैफ अली खानच्या एका आगामी चित्रपटात त्याच्या बालपणीची भूमिका साकारणार होता. या व्यतिरिक्त सोनी सब टिव्हीच्या श्रीमद रामायणमध्ये पुष्कल ही महत्त्वाची भूमिका साकारत होता. इतक्या लहान वयात एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट मिळणे हीच त्याच्या कामाची पोचपावती होती. रिपोर्टनुसार, आग चौथ्या मजल्यावर लागली होती. आग लागली तेव्हा दोन्ही मुलं एकटेच घरात होते. पोलिस अधिकाऱ्यांनीदिलेल्या माहितीनुसार, घरात धुर जास्तप्रमाणात पसरला त्यामुळं दोघांनाही श्वास घेता आला नाही. त्यामुळं गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. शेजाऱ्यांनी घरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याचे पाहून दरवाजा तोडला. तेव्हा दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती. त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून येणारा धूर पाहिला आणि मदतीसाठी धावले. दरवाजा तोडल्यानंतर त्यांनी पाहिलं की दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती. तेव्हा मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वीर आणि शौर्य यांची आईदेखील अभिनेत्री आहे. रीता शर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांनीदेखील अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. क्रॅश कोर्स, क्राइम्स अँड कन्फेशन आणि चाहते या सिनेमात त्या दिसल्या होत्या. तर वीर आणि शौर्य यांचे वडिल कोटाच्या एका प्रमुख कोचिंग क्लासमध्ये शिकवतात. जेव्हा घटना घडली तेव्हा ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. तर रीता मुंबईला हो्त्या. या घटनेनंतर मुलांच्या वडिलांनी डोळे दान करण्याचा निर्णय कुटुंबांनी घेतला आहे.
Veer Sharma Death Who Was Veer Sharma Veer Sharma Biography Veer Sharma Tv Actor Veer Sharma Kota Fire Shaurya Sharma Death Shrimad Ramayan Actor Veer Hanuman Child Actor Veer Sharma Pushkal Role Veer Sharma Lakshman Role Saif Ali Khan Film Child Actor Rita Sharma Actress Jitendra Sharma Faculty Kota Kota Fire Tragedy Rajasthan Fire Accident Kota Apartment Fire Deepshree Building Fire Anantpura Police Station Tejeshwani Gautam Sp Bhupendra Singh Inspector Kota Coaching City Tragedy Veer Sharma Obituary Shaurya Sharma Iit Aspirant Veer Sharma
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कैजुअल अवतार में स्पॉट हुईं शर्मा सिस्टर्स Neha Sharma और Aisha Sharma, स्टाइल और स्वैग ने जीता फैंस का दिल!Neha Sharma and Aisha Sharma Viral Video: बॉलीवुड की शर्मा सिस्टर्स यानी नेहा शर्मा और आयशा शर्मा Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Neha Sharma से खूबसूरती में कम नहीं हैं उनकी बड़ी बहन Aisha Sharma, बीच लुक में बढ़ाया इंटरनेट टेम्परेचरAisha Sharma Viral Video: Aisha Sharma Video: नेहा शर्मा की बड़ी बहन आयशा शर्मा खूबसूरती में किसी Watch video on ZeeNews Hindi
Read more »
अपार्टमेंट के नीचे ट्रेडिशनल सूट में स्टाइल मारते दिखीं Neha Sharma और Aisha Sharma, कम्पलीट लुक पर फिदा हुए फैंसNeha Sharma Aisha Sharma: शर्मा सिस्टर्स हर इवेंट में अपने स्टाइलिश लुक की वजह से सुर्खियां बटोर ही Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Abhishek Sharma Creates T20I History: মরুশহরে মরুদেশের বিরুদ্ধে মহাপ্রলয় অভিষেকের, ভারতের সঙ্গেই যুবরাজের শিষ্যেরও ইতিহাস!Abhishek Sharma Creates T20I History UAE vs India at Dubai Asia Cup 2025
Read more »
Watch: বেডরুমে অর্ধনগ্ন মডেল, ঘরে লুকিয়ে বিশ্বকাপজয়ী অলরাউন্ডার! এশিয়া কাপের মাঝেই...hardik pandya is dating mahieka sharma what we know so far
Read more »
अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सेहवाग म्हणाला 'एक लक्षात ठेव, नाहीतर भविष्यात...'Abhishek Sharma on Pakistan: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर तुफान फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा चर्चेत आहे.
Read more »
