Ajit Pawar Death In Plane Crash: अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून सुरु झाली असून पहिल्यांदाच सीआयडीने अजित पवारंच्या निकटवर्तीयाला चौकशीसाठी बोलावलं होेत. चार तास ही चौकशी चालली.
Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावजळ अपघात झाला आणि या अपघातामध्येच अजित पवार ांसहीत विमानातील इतर पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरीकडे अमोल अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका घेतली जात असतानाच दुसरीकडे सीआयडीने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची आज या प्रकरणासंदर्भात चौकशी केली. बारामती दौऱ्याची माहिती घेतलीसीआयडीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्याकडून जाणून माहिती घेतली. सीआयडी अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या खाजगी सचिवांकडून बारामती दौऱ्याची माहिती घेतली. 28 जानेवारी रोजी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत माहिती घेण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. 27 जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का, याबाबत देखील अविनाश सोलवट यांची चौकशी केली. अजित पवारांच्या प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले होते याबाबत सुद्धा विचारपूस करण्यात आली.नक्की वाचा >>अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? विमानाचा दोनदा...; सर्व सीसीटीव्ही फुटेज...चार तास चौकशी; कोणते प्रश्न विचारले?अविनाश सोलवट यांची चौकशी मंत्रालयात करण्यात आली. ही चौकशी चार तासांहून अधिक वेळ सुरु होती. त्यांना अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, 27 जानेवारी रात्रीच्या चर्चा आणि इतर संबंधित माहितीविषयी प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांच्या उत्तरांमधून अपघाताच्या कारणांसाठी तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर तपशील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या का याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे.एकूण तीन टप्प्यांमध्ये तपासअजित पवारांच्या विमानत अपघाताची तीन स्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे. दुसऱ्या स्तरावर विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार. यामधून विमान जमीनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे. तर अपघाताचा प्राथमिक अहवाल तिसऱ्या टप्प्यामध्ये सादर केला जाणार आहे.नक्की वाचा >>थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने बरोबरच जाऊ, पण..; स्वत: सांगितला घटनाक्रमअंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Baramati Ajit Pawar Plane Crash अजित पवार विमान अपघात Maharashtra महाराष्ट्र महाराष्ट्र बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Ajit Pawar Plane Crash CCTV: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा CCTV समोर; बरोबर 8 वाजून 46 मिनिटांनी...; एकच आगडोंबAjit Pawar, Baramati, Ajit Pawar Plane Crash, अजित पवार, विमान अपघात, Maharashtra, महाराष्ट्र, महाराष्ट्र बातम्या
Read more »
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भातील A टू Z सर्व माहिती; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरंAjit Pawar, Baramati, Ajit Pawar Plane Crash, अजित पवार, विमान अपघात, Maharashtra, महाराष्ट्र, महाराष्ट्र बातम्या
Read more »
Last Image of Ajit Pawar before Plane Crash: বিগ বিগ ফাইন্ডিং! মৃত্যুর ঠিক আগে, জীবনের শেষ ছবি! সাড়া ফেলা সেই ছবিতে বিমানের ভিতরে অজিতের পাশে...last image of Ajit Pawar Ajit Pawar Plane Crash Updates Ajit Pawar Dies in Plane Crash Maharashtra last image of Ajit Pawar found in aircraft
Read more »
Ajit Pawar Death News LIVE: PM अजित पवार की पत्नी से मिलने पहुंचे फडणवीस-शिंदे, निधन पर जताया दुखAjit Pawar Death News LIVE | Ajit Pawar Plane Crash LIVE | अजित पवार के शव की कैसे हुई पहचान, चश्मदीद ने खोला राज, कौन सा सपना रहा अधूरा?
Read more »
Identify Ajit Pawars Body: বীভৎস ভাবে পুড়ে যাওয়া দলা-পাকানো দেহ! আগুনধোঁয়ার ধ্বংসস্তূপের মধ্যেও অজিত পওয়ারকে চিনিয়ে দিল এই ছোট্ট জিনিসটি...identify ajit pawars body wristwatch sitting position help cops identify ajits body Baramati plane crash Ajit Pawar Plane Crash Ajit Pawar Dies in Plane Crash
Read more »
अजित-शरद की NCP का एक होना तय, BJP भी राजी: शरद गुट के 8 सांसद मोदी सरकार को समर्थन देंगे, पार्टी संभालने प...Maharashtra Deputy CM Ajit Pawar Pune Baramati Airport Plane Crash; Follow Maharashtra NCP, Ajit Pawar Death Latest News, NCP Merger, Sharad Pawar, Sunetra Pawar Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
